S M L

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2014 08:12 PM IST

dhanjay_munde_dcc_bank22 डिसेंबर : अखेर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची माळ पडलीये. धनंजय मुंडे यांच्या नियुक्तीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली आहे.

गेले दोन आठवडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचा वाद रंगला होता. अखेर सभापती आणि सत्ताधारी पक्षात एकमत होऊन विधानपरिषदेत सर्वाधिक संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली.

वंजारी समाजाचा तरुण आणि आक्रमक नेता अशी धनंजय मुंडेंची ओळख आहे. यामुळेच त्यांची राष्ट्रवादी पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे.

विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेला वाद सर्वश्रूत आहे. सत्ताधारी पक्षात गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे असल्यामुळे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचं नाव पुढे करण्यात आलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंचं नाव पुढे केल्यामुळे सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्यात. आता त्यावर शिक्कामोर्तबही झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 08:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close