S M L

'पीके'वर बंदी घालण्याची हिंदू संघटनेची मागणी

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2014 09:06 PM IST

'पीके'वर बंदी घालण्याची हिंदू संघटनेची मागणी

amir_khan_pk20 डिसेंबर : देवाचे बडवे 'राँग नंबर' लावतात असा आरोप करणारा पीके अर्थात आमिर खान सिनेमात धम्माल उडवून देतो. पण सिनेमातली ही कथा आता खर्‍या जगात कुणाला पचनी पडत नाहीये. 'हिंदू लिगल सेल' या हिंदुत्ववादी संघटनेनं पीकेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.

मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आणि संवेदनशिल दिग्दर्शक अशी ओळख असलेले राजू हिराणी या जोडीने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. पीके सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत होता आणि अपेक्षेप्रमाणे तो चर्चेला खरा उतरला. सिनेमाची कथा ही समाजाच्या वर्मावर बोट ठेवणारी आहे. त्यामुळेच पीकेच्या भोवती वादाचे ढग आता आणखी गडद होऊ लागले आहे. हिंदू लिगल सेल या हिंदुत्ववादी संघटनेनं पीकेवर बंदी आणण्याची मागणी केली. पीके सिनेमा हिंदू धर्माविरोधात भाष्य करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. या संघटनेनं दिल्लीमधल्या अमर कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर आपण आमिर खान आणि राजू हिराणी यांच्या विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं ही या संघटनेचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे ही संघटना कायदे विषयक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी आणि वकिलांची संघटना आहे. तर दुसरीकडे ट्विटरवरही याच मुद्यावरुन ट्विट युद्ध रंगलंय. 'बॉयकॉटपीके' आणि 'सपोर्ट पीके' या दोन हॅश टॅग वरुन हे युद्ध पेटलंय. हजारोंच्या संख्येनं लोक या दोन्ही हॅश टॅगचा वापर करत आहेत. त्यामुळे हा सिनेमा नव्या वादात अडकलाय. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत यांची प्रेमकथाही आहे. त्यात अनुष्का भारतीय आणि सुशांत पाकिस्तानी दाखवलाय. यालाही या संघटनांचा विरोध आहे. त्यासाठी या संघटना कोर्टात जाणार आहेत. प्रेक्षक मात्र पीके सिनेमाला एकच गर्दी करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close