S M L

परभणीतल्या सरकारी हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघड

5 ऑगस्टपरभणीतल्या सरकारी हॉस्टेलमधल्या शाळकरी मुलांवर कॉलेजमधल्या मुलांनी रॅगिंग केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आह. मुलांनी कलेक्टरकडे याबाबतची लेखी तक्रार दिली, पण अजूनही याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. धार रोड परिसरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. सीनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना जमिनीवर सांडलेली भाजी जीभेनं चाटणं भाग पाडलं. सीनिअर मुलांनी आपल्याला खोलीत कोंडून मारहाण केली, अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. याबाबत 9वी, 10वी आणि 12वीच्या 15 विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे, पण हॉस्टेल प्रशासन याबाबत कारवाई करणं टाळत आहे, अशीही या विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2009 12:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2009 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close