S M L

अखेर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद, विखे पाटील यांची निवड

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2014 05:17 PM IST

FMNAIMAGE78506Radhakrishna Vikhe-Patil23 डिसेंबर : अखेर काँग्रेसला विधानसभेत विरोधी बाक मिळालाय. अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यात आलीये. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विखे पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधीपक्षनेतेपद कुणाकडे जाणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. सत्ता स्थापन झाल्यानंर ज्या पक्षाकडे जास्त जागा असता त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. काँग्रेसने 42 जागा जिंकल्यामुळे विरोधीपक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. तर राष्ट्रवादीनेही विरोधीपक्षनेतेपदावर दावा केला होता. काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नाव पुढे करण्यात आलं. राष्ट्रवादीने आर.आर. पाटील यांचं नाव जाहीर केलं. राष्ट्रवादीने आपल्याला अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. पण काल सोमवारीच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचा विरोधीपक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. अखेरीस आज या वादारुन पडदा उठला आणि विरोधीपक्षनेतेपदाची माळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात पडली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2014 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close