S M L

पाणी द्या, शेतकर्‍यांचं कालव्यात उतरून आंदोलन

Sachin Salve | Updated On: Dec 24, 2014 10:36 PM IST

पाणी द्या, शेतकर्‍यांचं कालव्यात उतरून आंदोलन

manmad_kalwa24 डिसेंबर : राज्यभर थंडी पडलीय आणि या अशा कडाक्याच्या थंडीत मनमाडमध्ये सरकारच्या अनास्थेवर संतापलेले शेतकरी कालव्यात उतरून आंदोलन करत आहेत. पिकं वाचवण्यासाठी आणि जनावरांसाठी ओझरखेड कालव्यातून पाणी मिळावं, अशी या शेतकर्‍यांची मागणी आहे.

संकटात सापडलेले पिकं वाचविण्यासाठी आणि जनावरांना पिण्याकरिता ओझरखेड कालव्यातून पाणी देण्यात यावं या मागणीसाठी चांदवड तालुक्यातल्या वाहेगाव,पिंपळद, वाकीखुर्द,टाकळी चार गावातील शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांना सोबत घेऊन आमरण उपोषण सुरु करून कालव्यात उतरून आंदोलन केले.

ओझरखेड कालव्यातून चारी काढण्यासाठी या चार गावातील शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आले आहे. जमीन संपादित करताना तुम्हाला शेतीसाठी आणि जनावरांना पिण्याकरिता पाणी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अगोदरच सर्व पिके हातातून गेली जी उरली आहे. ती जागविण्यासाठी कालव्यातील पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र, पाणी देण्यात येत नाही पाणी मिळावे यासाठी उपोषण करण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. कालव्यातून पाणी देण्यात आले नाही तर कालव्यातच आत्महत्या करून घेऊ असा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close