S M L

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 25, 2014 11:06 AM IST

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून सुरुवात

25 डिसेंबर : अहमदनगरमध्ये आजपासून चित पटीचा खेळाचा फड रंगणार आहे. 58व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून अहमदनगरमध्ये सुरुवात होते आहे.

तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी राज्यभरातून 44 संघ आणि प्रशिक्षकांसह शेकडो पैलवान नगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं आजपासून अस्सल महाराष्ट्राच्या मातीतल्या या खेळाला सुरुवात होणार आहे. ज्यात पैलवानांच्या डावांचा आणि ताकदीचा कस लागेल.

ही स्पर्धा आठ वजन गटांमध्ये पार पडणार असून यात लाला माती आणि मॅट अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे, हे विशेष. स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचीत घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि बाउन्सर तैनात करण्यात आलेयत. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा नरसिंग यादव या स्पर्धेत नसणार आहे. त्यामुळे इतर पैलवानांना संधी मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2014 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close