S M L

राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2014 04:15 PM IST

राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

26 डिसेंबर :  राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारने आज (शुक्रवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार बहुतेक मंत्री, आमदारांनी आपआपल्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्याचं दिसत आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे मुंबई उपनगराचे, सुभाष देसाई मुंबई शहराचे, एकनाथ शिंदे ठाण्याचे, तर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी दोन दिवसांत पालकमंत्र्यांचे नावे जाहीर केली जातील, असे सांगितले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 • मुंबई उपनगर - विनोद तावडे
 • मुंबई शहर - सुभाष देसाई
 • सिंदुदुर्ग - दीपक केसरकर
 • ठाणे - एकनाथ शिंदे
 • नाशिक, नंदूरबार - गिरिष महाजन
 • जळगाव, बुलडाणा - एकनाथ खडसे
 • बीड, लातूर - पंकजा मुंडे
 • परभणी, नांदेड - दिवाकर रावते
 • पुणे - गिरीष बापट
 • सांगली, कोल्हापूर - चंद्रकांत पाटील
 • वर्धा, चंद्रपूर - सुधीर मुणगंटीवार
 • औरंगाबाद - रामदास कदम
 • पालघर - विष्णु सावरा
 • गडचिरोली - अंबरिश अत्राम
 • गोंदिया - राजकुमार बडोले
 • परभणी, नांदेड - दिवाकर रावते
 • रायगड - प्रकाश मेहता
 • रत्नागिरी - रवींद्र रायकर
 • अहमदनगर - राम शिंदे
 • धुळे - दादाजी भुसे
 • सातारा - विजय शिवतारे
 • सोलापूर - विजय देशमुख
 • अमरावती - डॉ. प्रवीण कोटे
 • अकोला, वाशीम - डॉ. रणजीत पाटील
 • यवतमाळ - संजय राठोड
 • नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
 • भंडारा, उस्मानाबाद - डॉ. दीपक सावंत
 • जालना - बबनराव लोणीकर
 • हिंगोली - दिलीप कांबळे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2014 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close