S M L

प्रवीण दरेकर शिवसेनेच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 27, 2014 08:34 PM IST

pravin darekar27 डिसेंबर  : मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर हे सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. शनिवारी प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण आले आहे. मातोश्रीवर सुमारे पाऊण तास दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रवीण दरेकर पक्षनेतृत्वावर नाराज असून त्यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे बाळा नांदगावकर यांच्यासोबत असलेले मतभेदही उघड झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची भेटही घेतली होती. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नसल्याची दिसते.

प्रवीण दरेकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरेकर यांच्या राज्यातील भाजप नेत्यांशी भेटी-गाठी सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांची वरळीतील एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली होती. त्यावेळेस दरेकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. आता दरेकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

या दोघांमध्ये आज महापालिकेतील काही प्रश्नांसंदर्भात आणि गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासा संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, ही सदिच्छा भेट असून राजकीय निर्णय नवीन वर्षात घेणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2014 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close