S M L

काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाला दिग्गजांची दांडी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 28, 2014 05:59 PM IST

काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाला दिग्गजांची दांडी

28 डिसेंबर  :  या वर्षभरात निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या 130 व्या स्थापना दिवसानिमित्त आज (रविवारी) संपूर्ण देशातल्या काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज अनुपस्थित होते.

दिल्लीतल्या मुख्यालयत अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, जनार्दन द्विवेदी, कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा उपस्थित होते. पण उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र या कार्यक्रमला गैरहजर होते. तर दुसरीकडे मुंबईतही तिच परिस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या ध्वजवंदनाला हजर होते. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे, विधानसभेचे सध्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली.

पक्षाची मूळ रचना आणि प्रचार रणनीतीवर या कार्यक्रमात नव्यानं मंथन सुरू आहे. हे वर्ष काँग्रसेसाठी निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत वाईट राहिलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या तर विधानसभा निवडणुकांमध्येही महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे सततच्या पराभवानं पक्षात आलेली मरगळ काँग्रेस पक्ष नेमकी कशी दूर करणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वाना देण्यात आलं होतं पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायला हवी होती असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2014 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close