S M L

जातपंचायतीचं क्रौर्य, 9 दिवसांनंतरही आरोपी मोकाट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 28, 2014 06:46 PM IST

जातपंचायतीचं क्रौर्य, 9 दिवसांनंतरही आरोपी मोकाट

28 डिसेंबर  : बारामती तालुक्यातल्या झारगडवाडीमध्ये वैदू समाजातल्या वाळीत टाकलेल्या कुटुंबाला अमानुष मारहाण करण्याच्या घटनेला आज 9 दिवस झाले. पण, या प्रकरणातले मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. पोलिसांना आरोपींना अटक करण्यात अपयश आलं आहे.

संबंधित पीडित कुटुंबाला या वैदू जातपंचायतीने वाळीत टाकलं होतं. आम्हाला पुन्हा जातीत सामावून घ्या अशी विनंती करत हे कुटुंब 19 डिसेंबरला या जातपंचायतीकडे गेलं. पण यावेळी वैदू जातपंचायतीतल्या लोकांनी या पीडित कुटुंबांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता एवढचं नाही तर पीडित महिलेच्या योनीत मिरचीपूड टाकण्याचा अमानुष प्रकारही या जातपंचायतीच्या सदस्यांनी केला होता. या भीषण हल्ल्यात 3 महिलांसह 7 जण जखमी झाले होते.

या प्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला, मात्र आज 9 दिवस उलटूनही हल्ल्यातले 4 मुख्य सूत्रधार आणि इतर दोघे अजूनही फरार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2014 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close