S M L

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वी पुन्हा अटकेत

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2014 12:29 PM IST

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वी पुन्हा अटकेत

30 डिसेंबर  : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीयाला पाकिस्तान सरकारने दुसर्‍या प्रकरणांतर्गत पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा जेलमध्येचं राहावं लागणार आहे. त्याच्या वकिलांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली नजरकैदेत ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश इस्लामाबाद हायकोर्टाने सोमवारी फेटाळला होता, त्यानंतर त्याची काल रात्री जामीनावर सुटका होणार होती. याप्रकरणी भारताने आपली तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पाकिस्तानी सरकारने त्याला दुसर्‍या एका प्रकरणी पुन्हा ताब्यात घेतले आहे.

26/11च्या खटल्यात इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टाने पुराव्याअभावी 18 डिसेंबर रोजी लख्वीला जामीन मंजूर केला होता, त्यावर चौफेर टीका होऊ लागल्याने सरकारने त्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली नजरकैदेत ठेवण्यात आलं होते. त्यामुळे जामीन मिळूनही लख्वी तुरुंगातून सुटू शकला नव्हता. या आदेशाविरोधात लख्वीच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यावक कोर्टाने स्थानबद्धतेचे आदेश रद्द करून लख्वीच्या सुटकेच्या मार्ग मोकळा केला होता. मात्र पाकिस्तान सरकारने आता त्याला दुसर्‍या प्रकरणात ताब्यात घेतले असून आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2014 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close