S M L

नव्या वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Dec 31, 2014 03:44 PM IST

नव्या वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू

31  डिसेंबर  : सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात कोणतीही कुचराई राहू नये यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र मुंबई आणि उपनगरात पाहायला मिळतेय. ढाबे, नाक्यावरचे हॉटेल, 3 स्टार, 5-स्टार हॉटेल्स, सोसायटीची गच्ची इतकेच नव्हे तर घराघरांत या जल्लोषी स्वागतासाठी काय आखणी करायची याचीच चर्चा सुरू आहे.

आधी नाताळ आणि नंतर नवीन वर्षाचं आगमन यासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली आहे. हॉटेल्स, चौपाट्या, गेटवे, अशा नेहमीच्या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झालीये. त्यासाठी मुंबई पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येतं आहे. तळीरामांना घरी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी बारमालकांवर सोपवण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टला निरोप देत नव्या वर्षात सुरक्षित पदार्पण करता यावं, यासाठी काळजी घेतली जातं आहे. त्यासोबतचं मुंबईत महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. जवळपास 75 टक्के पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. अनेक ठिकाणी महिला पोलीस सामान्य वेशात महिलांची छेडछाड करणार्‍यांवर करडी नजर ठेवणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तावर महिला पोलीस असतील. तसंच जुहू चौपाटी, मरीन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी बंदोबस्त आणखी कडक ठेवण्यात येणार आहे. तसंच महिला छेडछाड विरोधी पथकही तैनात असेल. महापालिकेसोबत चर्चा करून पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज झालं आहे.

तर मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेत मुंबईकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. मध्य रेल्वे 4 विशेष गाड्या सोडणार आहे. रात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येतील.

31 डिसेंबरला मध्य रेल्वेच्या 4 विशेष गाड्या असतील

रात्री 1.30 वाजता सीएसटी ते कल्याण

रात्री 1.30 वाजता कल्याण ते सीएसटी

रात्री 1.30 वाजात सीएसटी ते पनवेल

रात्री 1.30 वाजता पनवेल ते सीएसटी

31 डिसेंबरला वेस्टर्न रेल्वेच्या 8 विशेष गाड्या असतील

चर्चगेट ते विरार - 1.15, 1.55, 2.25, 3.20

विरार ते चर्चगेट 12.15, 12.45, 1.40, 2.55

कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वेने 1600 जवान तैनात केले आहेत. रेल्वे सुरक्षा जवानांसह श्वानपथकही स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्था पाहणार आहे.

31 डिसेंबरच्या रात्री मर्यादेपेक्षा जास्त दारू पिवून गाडी चालवणार्‍यांना रोखण्यासाठी ट्रफिक पोलिसांनी अजब शक्कल लढवली आहे. एखादा व्यक्ती बारमध्ये दारू प्यायल्यानंतर त्याच्या घरी सुरक्षितपणे पोहोचावी यासाठी बारमालकांनी काळजी घ्यावी यासाठी पोलिसांनी परिपत्रक काढलय. दारू प्यायल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही नवी शक्कल मुंबई पोलिसांनी लढवली आहे. पण, यावर बार असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. या परिपत्रकानुसार कारवाई करणं कठीण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

31 डिसेंबरच्या रात्री आयोजित करण्यात येणार्‍या पाटर्‌यावर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएची करडी नजर असणार आहे. पार्टी ठेवताना एफडीएचा एक दिवसाचा परवाना घेण बंधन कारक करण्यात आला आहे. तसेच अन्न किंवा मद्यातून भेसळ होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे 200 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातही 31 डिसेंबरच्या रात्री आयोजित करण्यात येणार्‍या पाटर्‌यांमध्ये ग्राहकांना निकृष्ठ खाद्यपदार्थ दिले जाऊ नयेत म्हणून 23 फूड इन्स्पेकटर कार्यरत असणार आहेत. या पाटर्‌यामध्ये ग्राहकांना बनावट दारू दिली जाण्याची शक्यता असल्यानं एफडीएकडून दारूचे नमुने घेतले जाणार आहेत. दोषी पार्टी नियोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अस एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, हॉटेल मालक किंवा बार मालक यांनी टॅक्सींची सोय केल्याने या मालकांनी आरक्षित केलेल्या टॅक्सींची संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात गेली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण त्याच बरोबर थर्टी फर्स्टच्या रात्री अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांवर किंवा महिलांची छेड काढणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. साध्या वेषातील विशेष पथकेही नेमण्यात येणार आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये छेडछाडीचे प्रकार झाल्यास संबंधित हॉटेल मालकाला वाढवून देण्यात आलेली वेळेची परवानगी त्याचवेळी रद्द करण्यात येणार आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close