S M L

'पीके'वर बंदी घालण्याचा प्रश्नच नाही -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 03:22 PM IST

cm fadanvis31 डिसेंबर : आमिर खानच्या पीकेवरून सुरू असलेल्या वादंगावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका घेतलीये. राज्यात पीके सिनेमावर बंदी घालण्यास मुख्यमंत्र्यांनी ठाम नकार दिलाय. 'पीके'चे शो नीट झाले पाहिजे, हे राज्य सरकार बघेल. सेन्सॉरनं परवानगी दिल्यानंतर चित्रपट थांबवण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

पीके सिनेमाविषयी अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून पीके सिनेमा बंद करावा यासाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरली आहे. मात्र, राज्यात पीके सिनेमाचे शो सुरूच राहणार अशी हमी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या सिनेमाचे शोज सुरळीत होतील याची काळजी राज्य सरकार घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सेन्सॉरने परवानगी दिल्यानंतर चित्रपट थांबवण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उत्तरप्रदेशमध्ये पीके करमुक्त

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही हा सिनेमा करमुक्त करण्याचा विचार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, बजरंग दलानं आजही दिल्लीमध्ये निदर्शनं सुरुच ठेवली. या सिनेमात हिंदू देव देवतांचा अपमान झाला आहे, त्यामुळे या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी बजरंग दलानं केली आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी अशीच मागणी करत निदर्शनं केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close