S M L

डोन्ट वरी, तिन्ही मार्गांवर रात्री उशिरा विशेष लोकल !

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 07:36 PM IST

डोन्ट वरी, तिन्ही मार्गांवर रात्री उशिरा विशेष लोकल !

mumbai local4331 डिसेंबर : आज वर्षाचा अखेरचा दिवस अर्थात थर्टी फर्स्ट...त्यामुळेच मुंबईकरांच्या जल्लोषाला उधाण आले आहे. पण या जल्लोषानंतर घरी कसं पोहचायचं हा मोठा प्रश्न असतो.! पण, चिंता करण्याचे कारण नाही. मुंबईची लाईफलाईन आज पहाटेपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत सज्ज झाली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसंच वेळापत्रकात बदलही करण्यात आले आहेत. दररोज मध्य रेल्वे मार्गावर 12.35 ची शेवटची लोकल आज 1.30 वाजता सुटणार आहे. सीएसटी ते कल्याण, कल्याण ते सीएसटी आणि पनवेल ते सीएसटी या मार्गावरून शेवटच्या लोकलचा वेळ 1.30 वाजेचा असणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चर्चगेट ते विरार शेवटची गाडीही 3.20 वाजता तर विरार ते चर्चगेट 2.55 वाजता शेवटची गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे तळीरामांना सुरक्षित घरी पोहचवण्याची जबाबदारी बार मालकांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर पाटर्‌यांमध्ये दंग झाले आहे.

असं आहे नव्या गाड्यांचं वेळापत्रक

रात्री 1.30 वाजता सीएसटी ते कल्याण

रात्री 1.30 वाजता कल्याण ते सीएसटी

रात्री 1.30 वाजात सीएसटी ते पनवेल

रात्री 1.30 वाजता पनवेल ते सीएसटी

31 डिसेंबरला वेस्टर्न रेल्वेच्या 8 विशेष गाड्या

- चर्चगेट ते विरार - 1.15, 1.55, 2.25, 3.20 वाजता

- विरार ते चर्चागेट 12.15, 12.45, 1.40, 2.55 वाजता

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close