S M L

कोल्हापुरात बिबट्याला पकडण्यात वनाधिकार्‍यांना यश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2015 02:50 PM IST

कोल्हापुरात बिबट्याला पकडण्यात वनाधिकार्‍यांना यश

01 जानेवारी : नववर्षाच्या सुरूवातीलाच पहाटे कोल्हापूर इथल्या रुईकर कॉलनीच्या परिसरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्यासमोरच्या रिकाम्या जागेत बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या एका घरात शिरून बसल्याने कोल्हापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण बनले होते. अखेर घरातील सोफ्याखाली लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले आहे. लोकांना बघून गांगरलेल्या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्लादेखील केला. मात्र, वनाधिकारी आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला पकडण्यात यश मिळवले. त्याला बघण्यासाठी रुईकर कॉलनीमध्ये बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2015 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close