S M L

मुंबईत लैंगिक अत्याचार करून तरुणाची हत्या, तिघांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2015 03:21 PM IST

crime

01 जानेवारी : मुंबईमध्ये धक्कादायक घटना पुढे आली आहे. आपण आतापर्यंत मुंबईमध्ये मुलींवर झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या बातम्या ऐकल्या होत्या. पण आता मरीन ड्राईव्ह आणि शक्ती मिल्स परिसरात तरुण मुलांवरही लैंगिक अत्याचार घडल्याच्या घटना पुढे येत आहेत.

5 जणांनी मिळून दोन अल्पवयीन मुलांवर सामूहिकरीत्या अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर त्या दोघांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. यापैकी एक गुन्हा बहुचर्चित शक्तिमिलच्या निर्जन परिसरात घडल्याची धक्कादायक महिती या तिघांच्या चौकशीतून समोर आली. यात 5 आरोपींपैकी 3 जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे अजूनही फरार आहेत. 5 पेक्षा जास्त जणांनी हे कृत्य केलं असू शकतं, अशी माहिती पोलिसांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. या तिघांना पकडल्यानंतर त्यांनी आणखी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांनी 2011 साली आणखी एका तरुणावर असेच अत्याचार करून त्याचीही हत्या केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2015 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close