S M L

गडकरी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, मुंबईसाठी समिती योग्यच !

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2015 05:14 PM IST

Devendra Fadnavis & Nitin Gadkari01 जानेवारी : मुंबईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या निर्णयाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं सांगत गडकरींनी जोरदार पाठराखण केलीये.

मुंबईच्या विकासकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी असा प्रस्ताव मांडलाय. मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावामुळे मोठा वाद निर्माण झाला. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाचा कडाडून विरोध केलाय. मात्र, मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता भाजपचे नेते नितीन गडकरींनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केलीये. मुंबईत भाजपचा कार्यक्रम पार पडलाय. यानंतर गडकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, मुंबईबद्दल पंतप्रधानांना आस्था आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली तर मुंबईचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सुचना एकदम योग्य आहे असं गडकरी म्हणाले. तसंच भाजप सराकरनं यावर्षी हाती घेतलेल्या अनेक मोहिम आणि योजनांबद्दल माहिती दिली. तसंच गॅस सबसिडी आता थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसंच मोदींच्या स्वच्छ भारत अभियात, मेक इन इंडिया अशा मोहिमांबद्दल पुर्नरूच्चार केला. राज्यात 1 लाख पंप सौर उर्जेवर चालणार असल्याचं भाजपचं धोरण असल्याची माहितीही गडकरींनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2015 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close