S M L

पाकला उपरती, लख्वीच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव !

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2015 11:10 PM IST

1912_ZakiurRehmanLakhvi_a01 जानेवारी : मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड अतिरेकी झकिऊर रहमान लख्वीच्या जामिनाविरोधात पाकिस्तान सरकारने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दहशतवादविरोधी कोर्टाने झकीऊर रहमान लख्वीला जामीन देऊन 2 आठवडे उलटल्यानंतर पाक सरकारनं हे पाऊल उचललंय.

पाकिस्तानमध्ये पेशावरमध्ये तालिबान्यांनी शाळेत केलेल्या हल्ल्यानंतर अवघं जग पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहिलं होतं. भारतानेही सोबत असल्याची ग्वाही दिली होती. एवढंच नाहीतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी दहशतवादाचा नायनाट करणार अशी गर्जना केली होती. पण, त्यांच्या या वक्तव्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी झकिऊर रहमान लख्वीला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. पाकच्या या दुटप्पीपणाचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला. त्यामुळे पाक सरकारला उपरती झाली. पाक सरकारने लख्वी जेलमध्येच राहिलं असं स्पष्ट केलं. पण, अनेक वेगवेगळ्या गुन्हात पुन्हा लख्वीचं जामीन आणि अटक नाट्य सुरू झालं. अखेर पाक सरकारने आता या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीये. लख्वीला ताब्यात घेण्याच्या आदेशाला इस्लामाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याविरोधात पाक सरकारने ही याचिका दाखल केलीये. दरम्यान, एका अपहरण प्रकरणी लख्वीला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणी लख्वीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. झकिऊर रहमान लख्वीला आता 15 जानेवारीला कोर्टात हजर करण्यात येईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2015 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close