S M L

कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीत वसणार तिसरी मुंबई, मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2015 05:06 PM IST

कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीत वसणार तिसरी मुंबई, मुख्यमंत्र्यांची मंजुरी

02 जानेवारी :  गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील 27 आणि भिवंडी-निजामपूर महापालिके बाहेरील 61 गावांच्या विकास आराखडयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रात नवी मुंबईसारखं नियोजित शहर उभे रहाण्याच्या तयारीला वेग येणार आहे. या निर्णयामुळे या भागातील अनधिकृत आणि मनमानी बांधकामांवर नियंत्रण येण्याबरोबरच आणखी एका मुंबईच्या विकासाचे स्वप्नही वास्तवात येण्याची अपेक्षा केली जात आहे.

भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली शहराभोवती असलेल्या 88 गावांमधील वाढते नागरीकरण आणि त्यामुळे होणारी मनमानी बांधकामांमुळे या भागात पायाभूत सुविधांबरोबरच अनधिकृत बांधकामांचाही प्रश्न गंभीर बनत चालला होता. त्यामुळे या परिसराचा सुनियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी तयार केलेल्या विकास आराखड्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने तो रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून गेली दोन वर्षे हा आराखडा चर्चेच्या फेर्‍यांमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे या भागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली. औद्योगिक, निवासी बांधकामासाठीही मोठया प्रमाणात आरक्षणे ठेवण्यात आल्यामुळे या भागात मोठयाप्रमाणात उद्योग येतील आणि सरकारला हजारो कोटींचा महसूल मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भिवंडी परिसरालगतच्या 60 गावांच्या विकास योजनेच्या आराखड्यासही सविस्तर चर्चेअंती मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिसरात लॉजिस्टीक हब विकसीत झाल्यास राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2015 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close