S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Jan 3, 2015 01:54 PM IST

modi in jnpt03 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरच्या दौर्‍यावर आहेत. काही वेळातच मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. शहरातल्या पोलीस परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम होतोय.

मोदींसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू राज्यपाल सी. व्ही. राव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाची तयारी आता पूर्ण झाली असून कोल्हापूर शहराला सध्या पोलीस छावणीचं स्वरुप आलंय. जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच केंद्रीय सुरक्षा पथकंही कोल्हापूरमध्ये दाखल झालंय. तसंच शहरातल्या वाहूतक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2015 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close