S M L

साईंच्या चरणी तब्बल 11 कोटींची देणगी

Sachin Salve | Updated On: Jan 3, 2015 05:47 PM IST

साईंच्या चरणी तब्बल 11 कोटींची देणगी

saibaba03 जानेवारी : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सतत भक्तांची रीघ लागलेली असते. दरवर्षी मंदिराच्या दानात भर पडत असते आणि दानपेटीतील पैशांचे विक्रम मोडले जातात. यंदा तर 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या केवळ 6 दिवसांच्या सुट्टीत शिर्डी साईबाबा संस्थानाच्या तिजोरीत तब्बल साडे अकरा कोटींची भर पडलीय. गेल्या वर्षापेक्षा 25 लाखाने यांत भर पडली आहे.

आतापर्यंतची ही विक्रमी देणगी म्हणता येईल. दानपेट्यांमध्ये एकूण 6 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे. देणगी काऊंटर, चेक, डीडी आणि ऑनलाईन पेमेंटमार्गे 3 कोटी 80 लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. तर जवळपास रु. 68 लाखांचं पावणे तीन किलो सोनं आणि 3 लाखांची 16 किलो चांदी देणगी स्वरूपात जमा झाली आहे. त्याचबरोबर परकीय चलनाच्या देणग्याही मोठ्या प्रमाणात येत असतात. यावेळी एकूण 40 देशांचं परकीय चलनात देणगी देण्यात आली आहे. मात्र याची मोजणी अजून व्हायची आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2015 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close