S M L

खंडोबाच्या यात्रेत हत्ती बिथरला, वृद्ध महिलेचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jan 3, 2015 07:58 PM IST

खंडोबाच्या यात्रेत हत्ती बिथरला, वृद्ध महिलेचा मृत्यू

satara_hatti03 जानेवारी : सातारा जिल्ह्यातील पाल येथील खंडोबा यात्रेला दुर्घटनेमुळे गालबोट लागलंय. यात्रे दरम्यान हत्ती बिथरला आणि त्याने जमिनीवर अंग टाकले. हत्तीखाली दबल्यामुळे एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 10 भाविक जखमी झाले आहेत त जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

पाल येथील श्री खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून सुमारे 4 लाख भाविक उपस्थित होते. श्री खंडोबा व म्हाळसा देवी लग्न सोहळा होवून हत्ती वरुन मिरवणूक काढण्याची परंपरा गेली अनेक वर्षे आहे. ही हत्तीवरून मिरवणूक सुरू असताना अचानक कुणीतरी हत्तीच्या सोंडीवर घोंगडे टाकल्याने हत्ती बिथरला आणि हत्तीने अंग जमिनीवर टाकून दिलं. यामध्ये अंजना नामदेव कांबळे या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाली. माहुताने मोठ्या हिंमतीने हत्तीवर अंकुश आणला त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. पण या गोंधळामुळे लोक भय भीत झाले आणि चेंगराचेंगरी झाली. यात 10 भाविक जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2015 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close