S M L

धनगर आरक्षणासंदर्भात 15 दिवसांत निर्णय -मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Jan 4, 2015 07:23 PM IST

Dev news

04 जानेवारी : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवरून मागे हटणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आरक्षणाला सरकार हात लावणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूरमध्ये रविवारी धनगर समाज आरक्षण परिषदेतर्फे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आरक्षणासंदर्भात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा फायदा मिळायला पाहिजे आणि यासाठी आमचं सरकार तातडीने निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे असे फडणवीस यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर काही संघटना या निर्णयाविरुद्ध कोर्टात जातील, त्यामुळे यासंदर्भात ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन 15 दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनात सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आणि अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे नामकरण करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अहिल्यादेवीचे नाव दिल्याने विद्यापीठाचा गौरव वाढेल तर नगर जिल्ह्याला अहिल्याबाईनगर असे नाव देण्याचा विचार चांगला आहे. मात्र या मुद्द्यावरून वाद होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धनगरांच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी आरक्षित कुरणे देण्याचाही निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2015 07:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close