S M L

बिअरच्या कॅनवर गांधीजींचा फोटो

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2015 11:04 AM IST

बिअरच्या कॅनवर गांधीजींचा फोटो

05 जानेवारी :  आयुष्यभर दारूविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचा फोटो अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैद्राबाद कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर कंपनीने माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेतील न्यू इंग्लंड ब्रूईंग या कंपनीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं नाव देऊन 'गांधी बोट' ही बिअर बाजारात आणली आहे. गांधीजींप्रमाणे ही बिअरही शाकाहारी असून आत्मशुद्धिकरण आणि सत्याच्या शोधात असलेल्यांसाठी ही बिअर आहे अशी जाहिरातबाजीही या कंपनीने सुरू केली होती. हा प्रकार समजताच त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले.

हैद्राबादमधल्या एका वकिलाने कोर्टात कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. महात्मा गांधीजींच्या छायाचित्रांचा अशा कामासाठी वापर करणे दंडनीय अपराध असून यामुळे राष्ट्रभावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ते वकील जनार्दन रेड्डी यांनी केला होता. याप्रकरणी आज (सोमवारी) सुनावणीही होणार आहे. याविरोधात भारतीयांमधून तीव्र पडसाद उमटल्यावर या कंपनीनं माफी मागितली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close