S M L

भगवान गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2015 02:45 PM IST

भगवान गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक

Dhananjay munde @ bhagwan gad

05 जानेवारी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर संतप्त जमावाकडून भगवान गडावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी घडली. आक्रमक जमावामुळे धनंजय मुंडे यांना भगवानगडावरून माघारी परतावे लागले.

भगवान गडावर सध्या सुवर्ण महोत्सवी सप्ताह सुरू असून उद्या या सोहळ्याची सांगता होणार आहे. यासाठी उद्या स्वत: मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री भगवानगडावर उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी धनंजय मुंडे दर्शनासाठी भगवान गडावर गेले होते. त्यावेळ संतप्त जमावाने धनंजय मुंडे यांच्या गाडीवर जबरदस्त दगडफेक केली. संतप्त जमावाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. भगवानगडाचे महाराज नामदेव शास्त्री यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, जमाव कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नव्हता. संतप्त जमावाने गडाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना गडाच्या मागच्या बाजूने माघारी परतावे लागले.

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. भगवान गडाचा राजकारणासाठी वापर केला जात असून, आजचा प्रकार दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याच बरोबर आपण या विरोधात पोलिसात तक्रार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close