S M L

कार्यकर्त्यांची सुटका, नोव्हेंबर 2014 पर्यंतचे राजकीय खटले मागे

Sachin Salve | Updated On: Jan 5, 2015 05:42 PM IST

कार्यकर्त्यांची सुटका, नोव्हेंबर 2014 पर्यंतचे राजकीय खटले मागे

05 जानेवारी : फडणवीस सरकारने नव्या वर्षात कामाला धडाक्यात सुरुवात केलीये. नोव्हेंबर 2014 पर्यंत सामाजिक अथवा राजकीय खटले कार्यकर्त्यांवर दाखल झाले आहे त्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. या खटल्यांतून कार्यकर्त्यांची सुटका करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

नोव्हेंबर 2014 पर्यंतचे सर्व राजकीय आणि सामाजिक खटले मागे घेण्याचा राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये 1 मे 2005 पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले खटले 7 जुलै 2010 च्या शासन निर्णयान्वये मागे घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. हे खटले मागे घेण्याची तारीख 1 मे 2005 ऐवजी आता 1 नोव्हेंबर 2014 पर्यंत वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीये. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळालाय. आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांकडून तोडफोड, जाळपोळ अथवा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रकरणी खटले दाखल केले जात असतात. विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात याची मान्यता 1 मे 2005 पर्यंत होती. फडणवीस सरकारने आता याची मर्यादा वाढवलीये त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close