S M L

देवकरांना सशर्त जामीन; धुळे, जळगावात प्रवेशबंदी

Sachin Salve | Updated On: Jan 5, 2015 06:41 PM IST

gulabrao devkar05 जानेवारी : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर केलाय. मात्र हा सशर्त जामीन असून देवकरांना धुळे, जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांना पुण्यातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांची 31 डिसेंबर 2013 रोजी धुळे तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. गेलं वर्षभर देवकर यांनी वारंवार जामीन मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अखेरीस देवकर यांना आज सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. देवकर यांना धुळे, जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांना पुण्यातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवकर यांना पुणे सोडायचं असल्यास पोलीस आयुक्तांनी याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. गुलाबराव देवकर यांची जामीन मंजूर करण्याबाबतची याचिका फेटाळल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आलाय.

जळगाव घरकुल घोटाळा

– झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घरं बांधण्याचा जळगाव नगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

– प्रकल्प मंजूर करण्यामध्ये गुलाबराव देवकरांची महत्त्वाची भूमिका

– योजना मंजूर झाली तेव्हा देवकर नगराध्यक्ष आणि उच्चाधिकार समितीचे सदस्य

– खान्देश बिल्डरला नियम डावलून प्रकल्पाचा ठेका दिल्याचा ठपका

– एका रात्रीतून निविदा प्रक्रियेचे नियम बदलण्यात आले

– ठेकेदाराला प्रारंभिक रक्कम देवकर यांच्या सहीनं दिली गेली

– प्रकल्पाची मूळ किंमत 89 कोटी होती

– हुडकोकडून 103 कोटींचं कर्ज घेतलं गेलं

– 29 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close