S M L

राज्यात रोहयोला किमान वेतन कायदा लागू

21 ऑगस्ट राज्यातील रोजगार हमी योजना आणि राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला किमान वेतन कायदा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे कष्टकर्‍यांच्या किमान वेतनात भरीव वाढ करून राज्य सरकारने आणखी निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा जीआर गुरूवारी जारी करण्यात आला. त्यानुसार रोजगार हमी योजनेवर काम करणार्‍या मजूरांना आता दिवसाला किमान 120 रुपये वेतन मिळणार आहे. याआधी राज्यात मजूरांना 66 रुपये इतकं किमान वेतन मिळत होते. दरम्यान दुष्काळी स्थितीवर तोडगा काढण्यासाठी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी दिल्लीत सर्व राज्यांच्या कृषीमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. 10 राज्यातले 246 जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेआहेत. या परिस्थितीचा सामना कसा करायचा यावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज्यातल्या कृषीमंत्र्चांशी बोलताना शरद पवार यांनी मान्य केलं की दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे सध्या उभं असलेलं खरीपाचं पीक वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, तसंच येणार्‍या रब्बी पिकांचं योग्य नियोजन कसं करायला हवं याची माहिती त्यांनी कृषीमंत्र्यांना दिली. दुष्काळग्रस्त राज्यांच्या राजधानीत आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये कंट्रोल रूम्स उभ्या करण्यात याव्यात अशी सूचनाही शरद पवार यांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2009 06:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2009 06:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close