S M L

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Jan 6, 2015 03:35 PM IST

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

06 जानेवारी : चौथ्या आणि शेवटच्या सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दमदार सुरुवात केली आहे. सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावत 300 धावांचा टप्पा पार केला आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाने 195 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरनं शतक ठोकलं तर त्याचा सलामीचा जोडीदार ख्रिस रॉजरचं शतक अवघ्या 5 रन्सनी हुकलं. सलामीवीर क्रिस रॉजर्स (95) आणि डेव्हिड वॉर्नर (101) धावांवर बाद झाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close