S M L

वर्ल्ड कपसाठी धोणी बिग्रेडमध्ये जडेजा-पटेल, युवराज बाहेरच

Samruddha Bhambure | Updated On: Jan 6, 2015 04:58 PM IST

वर्ल्ड कपसाठी धोणी बिग्रेडमध्ये जडेजा-पटेल, युवराज बाहेरच

06 जानेवारी : वर्ल्ड कप 2015 चं काऊंटडाऊन आता खर्‍या अर्थानं सुरू झालं असून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 2015 वर्ल्डकपसाठी कॅप्टन महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र या टीममध्ये युवराज सिंगला स्थान देण्यात आलं नाहीये. विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैनासारख्या बड्या खेळाडूंनी आपली जागा पक्की केलीये. तर जडेजा, अक्सर पटेल, मोहम्मद शमी आणि स्ट्युअर्ट बिन्नीनं टीममध्ये जागा पटकावली.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये होणार्‍या 2015 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये कोण-कोण असणार याची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. अगोदरच 30 जणांच्या संभाव्य टीममध्ये विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना स्थान मिळू शकलं नव्हतं. विशेष म्हणजे 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सिंहाचा वाटा उचलणार्‍या युवराज सिंगला डच्चू मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. युवराज सिंगची तरी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात समावेश होईल अशी चर्चा होती पण अखेर त्यावर आज पडदा पडला. आज (मंगळवारी) मुंबईमध्ये बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी वर्ल्डकपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली यंग बिग्रेड मैदानात उतरणार आहे. मात्र धोणीच्या या टीममध्ये फार मोठे बदल केले गेले नाहीत. विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैनासारख्या बड्या खेळाडूंची निर्वाद निवड करण्यात आलीये. पण त्याचबरोबर नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आलीये. रवींद जडेजा, अक्सर पटेल, मोहम्मद शमी आणि स्ट्युअर्ट बिन्नीनं टीममध्ये जागा पटकावली आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि ऑल राऊंडर या तिन्ही क्षेत्रात टीम इंडियाला भक्कम करण्याचा निवड समितीनं प्रयत्न केला आहे

वर्ल्डकपसाठी ही आहे टीम इंडिया

 • महेंद्रसिंग धोणी ( कॅप्टन )
 • विराट कोहली
 • अजिंक्य रहाणे
 • शिखर धवन
 • रोहित शर्मा
 • स्टुअर्ट बिन्नी
 • रविंद्र जडेजा
 • अंबाती रायडू
 • अक्षर पटेल
 • आर अश्विन
 • भुवनेश्वर कुमार
 • मोहम्मद शमी
 • उमेश यादव
 • इशांत शर्मा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close