S M L

झाडावर सापडला तरुणाचा मृतदेह

Sachin Salve | Updated On: Jan 6, 2015 07:40 PM IST

झाडावर सापडला तरुणाचा मृतदेह

bhandar_mudar_case06 जानेवारी : भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली तालुक्यात एका तरुणाच्या हत्येचं गूढ वाढलंय. शेखर निखारे या तरुणाचा झाडावर मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. शेखरचे गावातल्याच मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून त्याची हत्या झाली असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय.

साकोली तालुक्यातील सुकळी महालगाव येथील शेखर निखारे या 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झालाय. गावापासून 2 किलोमीटर अंतरावरच्या जंगलात झाडाला टांगलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. शेखरचे गावातल्याच मुलीशी प्रेमसंबंध होते. 2 वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या बुद्ध विहारात लग्नही केलं होतं. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना त्याला विरोध होता. मुलीच्या घरच्यांनीच शेखरची हत्या केल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केलाय. शेखर साकोलीमध्ये बीएच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचा मृतदेह आढळला त्याच्या 4 दिवस आधी तो पोलीस भरतीसाठी जातो असं सांगून घरातून गेला होता. त्याचं गावात कुणाशीच वैर नव्हतं. मुलीच्या घरच्यांनीच त्याची हत्या केली असा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. शेखरनं आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, शेखरचा मृतदेह ज्या झाडाला टांगलेला होता, तिथून त्याचे पाय सहज जमिनीला टेकले असते. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं त्याच्या मामांचं म्हणणं आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हा पोलीस तपासाच भाग असला तरी पोलीस या घटनेकडे आत्महत्या म्हणूनच पाहत आहेत मात्र घटना स्थळावरील स्थिती आणि परिस्थिती बघता वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 07:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close