S M L

महाराष्ट्रावर वीज संकट, कोळसा कामगार आजपासून संपावर

Sachin Salve | Updated On: Jan 6, 2015 07:53 PM IST

महाराष्ट्रावर वीज संकट, कोळसा कामगार आजपासून संपावर

caol workar06 जानेवारी : देशभरातील कोळसा कामगारांनी आजपासून संप पुकारलाय. हा संप पाच दिवसांचा आहे. त्यामुळे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या 79 कोळसा खाणीमधलं 98 हजार टन उत्पादन प्रभावित झालंय. तर सरकारला रोज दीडशे कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. या संपामुळे  वीजनिर्मितीलाही फटका बसणार आहे.

सरकारच्या नव्या कोळसा धोरणाच्या विरोधात पाच कामगार संघटनांनी आजपासून हा संप पुकारला आहे. या संपात इंटक, भामस, सीटु, आयटक, हिंद मजदुर सभा या संघटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जवळ समजल्या जाणार्‍या भारतीय मजदुर संघाचाही सरकारच्या धोरणाला विरोध आहे. या संपामुळे विदर्भात चंद्रपूरसह वेस्टर्न कोल फिल्डच्या जेवढ्या कोळसा खाणी आहेत. त्यावर या संपाचा परिणाम होणार आहे. वेकोलीच्या विदर्भात 79 कोळसा खाणी असून त्यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात 24 कोळसा खाणी आहेत. संपूर्ण विदर्भासह लगतच्या मध्यप्रदेशातील एकूण 54 हजार स्थायी तर 7 हजार कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. तर एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 25 हजार कामगार संपावर गेले आहेत या संपाचा फटका वीज वीजनिर्मितीलाही बसणार आहे. चंद्रपूरसह कोराडी वीज निर्मिती साठी आवश्यक असलेल्या कोळसाचा पुरवठाही प्रभावित होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 07:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close