S M L

संजय दत्तला हवी वाढीव सुट्टी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2015 11:13 AM IST

संजय दत्तला हवी वाढीव सुट्टी

07 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुन्हा वाढीव सुट्टी हवी आहे. त्यासाठी त्याने येरवड्याच्या जेल प्रशासनाकडे अर्जही केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात स्वत: जवळ शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त सध्या फर्लो सुट्टीच्या आधारे तुरुंगाबाहेर आहे.

संजय दत्तने सुट्टी वाढवण्यासाठी पुन्हा अर्ज केल्याच्या वृत्ताला येरवडा जेल प्रशासनाने दुजोरा दिला आहे. पण मुंबई पोलिसांच्या अहवालानंतरच या सुट्टीचा निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सुप्रीम कोर्टने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 18 महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे 2013 पासून उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण, या शिक्षेत, संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे.

शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कैद्याला 14 दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यामध्ये आणखी 14 दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता, ही रजा घेत असतानाच त्याने मुदतवाढीसाठीही अर्ज केला होता.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close