S M L

शुभा राऊळ शिवसेनेत परतल्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2015 02:10 PM IST

शुभा राऊळ शिवसेनेत परतल्या

07  जानेवारी : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ आज (बुधवारी) पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दहिसर मतदारसंघातील माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत वारंवार आवाज उठवूनही दाद मिळत नसल्याने नाराज झालेल्या शुभा राऊळ यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेत प्रवेश केला होता. मनसेच्या तिकीटावर त्यांनी दहिसरमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला होता. आता त्या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत.

अन्य कारणांमुळे शिवसेना सोडली होती, मात्र पक्ष नेतृत्वाशी मतभेद नव्हते, असं स्पष्टीकरण शुभा राऊळ यांनी दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close