S M L

दिवा तोडफोड प्रकरण : 20 आरोपींना जामीन आणि पुन्हा अटक

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2015 08:43 PM IST

rail roko 2347 जानेवारी : दिवा तोडफोड प्रकरणातल्या 20 आरोपींना आज (बुधवार) जामीन मंजूर झालाय. पण आता त्यांचा ताबा रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या आरोपींच्या नातेवाईकांनी ही कारवाई खोटी असल्याचा आरोप केलाय. या तोडफोडीमध्ये समावेश नसलेल्यांनाही अटक करण्यात आल्याचा आरोप होत आहेत.

दिव्यातील 2 जानेवारीच्या उद्रेकानंतर ठाणे पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली आणि 17 हजार आरोपींच्या विरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर रेल्वे पोलिसांनी 12 हजार आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मध्ये मुंब्रा पोलिसांनी आतापर्यंत 20 आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांचा आज जामीन झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या आरोपींचा ताबा घेतला. मुंब्रा पोलिसांची ही कारवाईच खोटी असल्याचं अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी दिव्यात दगडफेक झाली त्यावेळी तिथे अटकेत असलेला आरोपी हजरच नव्हता. कामावरून घरी परतल्यानंतर पोलिसांनी अटक केली असा आरोप मंगेश ढेंबेच्या नातेवाईकाने केला. असाच प्रकार अनेकांसोबत झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरदारांचा समावेश आहे. असाच प्रकार गणेश भिवान पिल्ली या तरुणासोबत झालाय. गणेशला खोट्या आरोपात अटक केल्याने आमच्याकडे जामीन करण्यासाठी पैसे नाहीत. मुळात अशा खोट्या गुन्ह्यात अटक करू नका, जर कारवाई करायचीच असेल तर गोळ्या घालून ठार मारा अशी व्यथा गणेशच्या वडिलांनी मांडली. तर आजारी असलेल्या आरोपीला औषधही द्यायला मनाई केल्याचाही आरोप करण्यात येतोय. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 08:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close