S M L

विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 3 नराधम अटकेत

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2015 05:00 PM IST

rape_63456508 जानेवारी : मुंबईतील विक्रोळीच्या पार्क साइटच्या सूर्यानगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर तीन व्यक्तींनी अश्लील चाळे करत अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार घडलाय. या प्रकरणी तीनही नराधमांना अटक करण्यात आलीये. यातील एक आरोपी हा 42 वर्षांचा आहे. आणि तो पीडित मुलीचा नातेवाईक आहे. गेल्या सहा महिन्यापासून या मुलीवर तो अत्याचार करत होता.

लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढच होत आहे. मुंबईतील विक्रोळीच्या पार्क साइट भागातील सूर्यानगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले जात होते. धक्कादायक म्हणजे यातील एक नराधम हा 42 वर्षांचा असून तो पीडित मुलीचा नातेवाईक आहे. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर या अनैतिक कृत्यात त्याने आपल्या दोन साथीदारांना सुद्धा सामिल केलं होतं. यातील एक आरोपी हा 24 वर्षाचा आणि दूसरा 20 वर्षांचा आहे. हे सर्व जण ही मुलगी घरी एकटी असली की, तिच्यासोबत अश्लील चाळे करीत असत. हे सर्व करत असताना कुठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा यांनी पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे या चिमुकलीने सहा महिने हा अत्याचार निमुटपणे सहन केला. बुधवारी सकाळी तिला जास्त त्रास झाला तेव्हा तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला तिच्या आईने लगेच पार्क साईट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तिघाही आरोपींना अटक केली आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार आणि विविध कलमानुसार गुन्हा दखल केला आहे. तर या मुलीला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close