S M L

लोकलची गर्दी टाळण्यासाठी आॅफिसच्या वेळा बदला -सुरेश प्रभू

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2015 11:40 PM IST

suresh_prabhu408 जानेवारी : मुंबईत लोकलची गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदला, अशी सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलीये. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली. सुरेश प्रभू यांच्या या सूचनेला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था झालेल्या मध्य रेल्वेची वाहतूक मागील आठवड्यात चांगलीच विस्कळीत झाली होती. दिवा स्टेशनवर प्रवाशांच्या उद्रेकानंतर रेल्वे प्रशासनानं उपाययोजनेला सुरुवात केलीये. यासंबंधी मंत्रालयात रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्या उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कायस्वरूपी समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आलीये. तसंच चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गाखाली सहा पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचे अपूर्ण असलेले विविध प्रकल्प तातडीने पूर्ण करून राज्याच्या सर्व भागांना योग्य न्याय देण्याबाबतही यावेळी विस्ताराने चर्चा झाली. राज्यातील रखडलेले तसंच नवीन रेल्वे प्रकल्पांच्या तातडीने अंमलबजावणीसाठी एकात्मिक परिवहन प्राधिकरण (इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट ऍथॉरिटी) स्थापन करण्याची रेल्वे मंत्र्यांची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. या बैठकी मुंबईच्या लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतल्या ऑफिसेसची वेळ बदलावी अशी सूचना सुरेश प्रभू यांनी केली. प्रभू यांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत सरकार अनुकूल कार्यवाही करेल असं सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 11:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close