S M L

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 02:14 PM IST

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचं निधन

bala_sawant09 जानेवारी : शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचं निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सावंत यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाळा सावंत हे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे ते आमदार होते आणि सलग दुसर्‍यांदा आमदार झाले होते.

त्यापूर्वी ते 3 वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वांद्रे मतदारसंघात त्यांचा त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. बाळा सावंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगले विश्वासू शिवसैनिक होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close