S M L

लोकलच्या टपावर टपोरी प्रवाशांचा उच्छाद

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 02:45 PM IST

लोकलच्या टपावर टपोरी प्रवाशांचा उच्छाद

local_tap09 जानेवारी : मुंबईची लाईफलाईन सदैव या ना त्या कारणाने चर्चेत असते. 'लोकलच्या टपावर बसून प्रवास करू नका' अशी वारंवार सुचना देऊनही काही आघाऊ प्रवाशी काही ऐकायचं नाव घेत नाहीये. हार्बर लाईनवर लोकलच्या टपावरून प्रवास करणार्‍या 25 प्रवाशांना रेल्वे पोलिसांना पकडलंय. या सर्व टपावर हवा खाणार्‍या प्रवाशांना कोर्टात हजर करून 1200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मुंबईतल्या सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरुन रोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांची जास्त गर्दी असते. यामुळे अनेक प्रवशांना बसायला तर सोडा पण ट्रेनमध्ये आत उभं राहण्यास सुद्धा जागा मिळत नाही. हार्बर रेल्वे वर गर्दी असल्याने अनेक प्रवासी विशेष करुन युवा वर्ग मात्र लोकल ट्रेनच्या टपावरुन बिनधास्त प्रवास करतो तर काही जण बाजूला असलेल्या खिडकीला लटकून प्रवास करतात. अशा या जीवघेण्या प्रवासात दररोज किमान 10 जणांचा मृत्यू ओढावतोय तर अनेक जण जखमी होवून कायमचे जायबंदी होतात. हार्बर मार्गावर मानखुर्द, गोवंडी, चेंबूर या स्टेशनहून रोज कित्येक युवक लोकल ट्रेनच्या टपावरुन प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळ अशी दृश्यं दिसतात. या सगळ्यांवर कारवाई करायला आता सुरुवात करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close