S M L

नर्सरीत प्रवेश आता तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरच !

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 04:40 PM IST

नर्सरीत प्रवेश आता तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरच !

09 जानेवारी : वयाची तीन वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनाच आता नर्सरीत प्रवेश देण्यात येणार आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 2015 -2016 या शैक्षणिक वर्षासाठी हा नियम लागू असेल. सध्या केवळ नर्सरीपुरतीच ही वयाची अट असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

शाळेची पायरी चढण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वेगवेगळे निकष असल्यामुळे पालकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. अडीच ते साडेतीन या वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाद्वारे नर्सरीमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे सर्व शाळांमधल्या प्रवेशासाठी वयाचा एकच निकष असावा असा प्रस्ताव शिक्षण विभागानं सरकारला दिला होता. त्यापैकी नर्सरीसंदर्भात हा नियम करण्यात आला आहे. त्यावर आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्कामोर्तब केलंय. पुढील शैक्षणिक वर्षापासून तीन वर्ष पूर्ण केलेल्या मुलांना नर्सरीत प्रवेश देण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close