S M L

सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात टीम इंडियाला यश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 10, 2015 01:24 PM IST

सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात टीम इंडियाला यश

10  जानेवारी :  अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या 38 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज अखेर ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 349 धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (80) आणि विराट कोहली (46) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारच्या संयमी बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियानं सिडनी टेस्ट अखेर ड्रॉ केली. भारत 2-0 अशी मालिका हरला असला तरी शेवटच्या दोन कसोटी अनिर्णित राखल्यामुळे भारताची काही प्रमाणात लाज राखली गेली आहे. पण टीम इंडियाला पुन्हा एकदा परदेश दौर्‍यावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2015 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close