S M L

आयबीएन लोकमतचा दणका, अखेर सुजाताला न्याय

Samruddha Bhambure | Updated On: Jan 10, 2015 07:52 PM IST

आयबीएन लोकमतचा दणका, अखेर सुजाताला न्याय

10 जानेवारी : कडेवर दहा महिन्याच्या चिमुकलीला घेऊन एसटीत कंडक्टर म्हणून काम करणार्‍या सुजाता इंगळेला अखेर न्याय मिळणार आहे. IBN लोकमतने सुजाताची व्यथा मांडल्यावर एसटी महामंडळ प्रशासनाला जाग आली असून सुजाताला तिच्या सोयीचे काम देऊ असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा आगारात सुजाता इंगळे या गेल्या 4 वर्षांपासून कंडक्टर म्हणून नोकरी करत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांना मुलगी झाली. सहा महिन्यांची प्रसुती रजा संपल्यावर सुजाता या पुन्हा कामावर रुजू झाल्या. सुजाता यांचे पती मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत असून मुलीची देखभाल करण्यासाठी घरात कोणीही नसते. त्यामुळे सुजाता यांना चिमुकल्या मुलीला घेऊन कामावर यावे लागते. कामावर रुजू झाल्यावर सुजाता यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे बैठे काम देण्याची विनंती केली.

मात्र सुजाता यांच्या विनंतीची दखल घेतली नाही. त्यामुळे आता सुजाता दररोज 10 महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन काम करावे लागते. एका हातात तिकीट यंत्र व कडेवर मुलगी अशी कसरत त्यांना करावी लागते. मुलीला झोपण्यासाठी एसटीमधील खांबावरच त्यांनी झोळीदेखील बांधली होती. सुजाता यांची ही व्यथा IBN लोकमतने मांडली होती. तिला अखेर न्याय मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2015 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close