S M L

चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणार रेल्वेचे जाळे -सुरेश प्रभू

Samruddha Bhambure | Updated On: Jan 11, 2015 12:57 PM IST

चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणार रेल्वेचे जाळे -सुरेश प्रभू

11 जानेवारी :  पूर्वांचलमधील आठ राज्यांमध्ये अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही. चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली. मार्च-एप्रिलमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत सीमेलगतच्या राज्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

देशाचा विकासदर वाढण्यामध्ये कनेक्टीव्हिटी महत्त्वाची आहे. या रेल्वेमुळे देशाचे अर्थकारण बदलू शकते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. त्यामुळे पूर्वांचलांमधील राज्यात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी केंद्राने 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. दोन्ही खात्यांकडून या प्रकल्पासाठी संयुक्त खर्च करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2015 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close