S M L

दरेकर, गीते उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2015 06:04 PM IST

दरेकर, गीते उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

12 जानेवारी :  मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गिते उद्या (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करतील.

प्रवीण दरेकर आणि वसंत गीते यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेसाठी हा मोठा हादरा समजला जात आहे. हे दोघेही मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत होते. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाने राज ठाकरेंचे निकटवर्तीय त्यांच्यापासून दुरावल्याचे दिसतंय.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. दरेकर आणि गीते हे दोघेही पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या दोघांचे राजीनामा स्वीकारत त्यांच्याशी पक्षाच्या कोणीही संबंध ठेवू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी याआधीच जारी केले होते. त्यामुळे ते दुसर्‍या पक्षात जाणार हे स्पष्ट झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही भाजपच्या संपर्कात होते. अखेरीस सोमवारी प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2015 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close