S M L

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2015 01:48 PM IST

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन

13 जानेवारी : गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्याने शिक्षक संघटनांनी आज (मंगळवारी) मुंबईवगळता एक दिवसाचा राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलन पुकारल आहे.

राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षके तर कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही तोडगा काढला नसून त्याकडे सतत दुर्लक्ष केल्याने, समन्वय समितीने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याविरोधात राज्यातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 2 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांनी पुकारलेला बंद मागे घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना केले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सर्वांनी बैठक घेऊन तोडगा काढू, असेही आश्वासन तावडे यांनी दिले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close