S M L

विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2015 02:00 PM IST

विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

13 जानेवारी :  विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (मंगळवारी) सकाळी भेट घेतली आणि फडणवीस यांच्यासमोर काही उपाययोजनाही मांडल्या आहेत. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासमवेत उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी 8 वाजता 'वर्षा'वर गेले होते. या भेटीत राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पुस्तके चाचणीनिहाय विभाजित करा, सर्व 6 विषयांचे दर तिमाही अभ्यासक्रमाचे एकच पुस्तक दिले जावे, यामुळे विद्यार्थ्यांना 6 ऐवजी 4 पुस्तकंच न्यावी लागतील, अशा काही उपाययोजनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवल्या. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये राज्याच्या अन्य प्रश्नांवरीही चर्चा झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close