S M L

कोर्टाचा राष्ट्रवादीला दणका, 'त्या' चार मतांसह सेनेचे सहाणे विजयी

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2015 02:31 PM IST

67sena13 जानेवारी : नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या वादावर अखेर पडदा पडलाय. या निवडणुकीबाबत चार वर्षानंतर मुंबई हायकोर्टाने निकाल दिलाय. या निवडणुकीचा निकाल शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या बाजूनं लागला. सेनेचे उमेदवार सहाणे विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला धक्का बसलाय.

2012 मध्ये झालेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत 4 मतं वादग्रस्त ठरली होती आणि त्या मतांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांना विजयी ठरवण्यात आलं होतं. या निकालाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. चार वर्ष या याचिकेवर सुनावणी सुरू होती. अखेर आज कोर्टाने आपला निकाल सेनेच्या पारड्यात टाकलाय. मुंबई हायकोर्टाने ती 4 मतं शिवाजी सहाणे यांची असल्याचं निकाल देत सहाणे यांना विजयी घोषित केलंय. सहाणे विजयी झाल्यामुळे जाधव यांची आमदारकी रद्द झाली आहे. जाधव यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close