S M L

1 ऑक्टोबरपासून रेल्वे तात्काळ सेवेसाठीच्या तिकिटांचे दर कमी

26ऑगस्ट1 ऑक्टोबरपासून रेल्वे आपल्या तात्काळ सेवेसाठीच्या तिकिटांचे दर कमी करणार आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनजीर्नी रेल्वे बजेट सादर करण्याच्या आधीही हा विचार बोलून दाखवला होता, आणि बजेटमध्ये तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता तुम्ही करत असलेल्या प्रवासाच्या अंतरानुसार तात्काळचं तिकीट आकारलं जाईल. सेकंड क्लाससासाठी बेसिक तिकीट दराच्या 10 टक्के रक्कम तात्काळ फी म्हणून आकारली जाईल. तर सेकंड एसीसाठी तिकीटाच्या 30 टक्के रक्कम फी म्हणून आकारली जाईल. एक्झिक्युटिव्ह सेकंड क्लास सिटिंगसाठी हा किमान चार्ज असेल 10 रुपये तर जास्तीत जास्त 15 रुपये. स्लीपर आणि एसी चेअर कारसाठी 75 ते दीडशे रुपये आकारले जातील. एसी थ्री, टू टीयर आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी किमान 200 ते जास्तीत जास्त 300 रुपये आकारले जातील. हे चार्जेस पीक आणि नॉन पीक पीरिएड, दोन्हीसाठी असतील. चार्ट तयार झाल्यानंतर तात्काळच्या ज्या सीट्स रिकाम्या राहतील त्या जनरल कॅटेगरीच्या RAC आणि वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना देण्यात येतील. पण तात्काळ तिकीटांच्या रिफंडसाठीचे नियम मात्र तसेच राहतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2009 09:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2009 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close