S M L

अखेर बेस्ट भाडेवाढीचा 'डबलडेकर' !

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2015 11:36 PM IST

best_bus3413 जानेवारी : महागाईने त्रस्त मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी चाप बसणार आहे. बेस्ट बसेसचा प्रवास महागणार होणार आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल अशी दोनदा भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात ही भाडेवाढ होणार असून प्रत्येकी 1 रुपयाने भाडेवाढ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेनं बेस्ट प्रशासनाला दीडशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही हे पैसे बेस्टला मिळू शकले नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने पर्यायाने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. बेस्टने एप्रिल महिन्यापासून 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून 1 रुपयाने दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बेस्ट प्रशासनाने मागिल महिन्यातच याला मंजुरी दिली. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीतही या दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. अखेर आज पालिकेनं यावर शिक्कामोर्तब केलंय.या दरवाढीमुळे शालेय विद्यार्थांनाही मोठा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांचा मासिक पास आता चांगलाच कडाडणार असून 125 रुपयांच्या पाससाठी 300 रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी गेल्यावर्षी भाडेवाढ केली नव्हती तोच बोजा आता मुंबईकरांवर सलग दोनदा पडणार आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत असतांना शिवसेना मात्र मुंबईकरांवर भाडेवाढ लादली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी भाडेवाड रद्द झाल्याचा ढोल वाजवणारी शिवसेना भाडेवाढ करतांना मुग मिळुन गप्प बसली आहे, असा आरोप होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 11:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close