S M L

गुहाघरमध्ये शिक्षकाकडून चिमुकलीचा विनयभंग

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2015 01:22 PM IST

rape-victims-

14 जानेवारी : गुहागर तालुक्यात इंग्रजी माध्यमामध्ये पहिलीत शिकणार्‍या मुलीचा शाळेतल्या शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक रुपेश खरेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.

गुहागर तालुक्यातील बालभारती या इंग्रजी शाळेत पहिलीत शिकणार्‍या मुलीवर शाळेतील शिक्षक रुपेश खरे हा अश्लील चाळे अत्याचार करत होता. पीडित मुलीने शाळेतील शिक्षक कसे चाळे करतो आणि अन्य मुलांसोबत तो कसा वागतो याची माहिती तिच्या आईला दिली. मुलीच्या आईने शाळेत जाऊन शिक्षकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्थेने संबंधित शिक्षकावर कारवाई केली नाही. शेवटी पीडिा मुलीच्या पालकांनी गुहागर पोलिसांकडे धाव घेत रुपेश खरेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई केल्यावर शाळा प्रशासनाला जाग आली असून आता रुपेश खरेला शाळेतून निलंबित करण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close